शाओमी रेडमी एस2 ची लाइव इमेज लीक, हा आहे शाओमी चा स्वस्त डुअल कॅमेरा वाला फोन

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की शाओमी कमी किंमती मध्ये एंडरॉयड फोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे जो खासकरून भारतासाठी बनवण्यात येत आहे. काही दिवसांनंतर हा फोन चीनी सर्टिफिकेशन साइट टेना वर पण दिसला होता. आज चीनी मीडिया ने शाओमी रेडमी एस2 चे लाइव फोटो लीक केले आहेत. फोटो च्या मधून या फोनच्या लुक आणि स्टाइलचा अंदाज लावला जाऊ शकतो. लीक फोटो मध्ये तुम्ही बघू शकता की मागच्या पॅनल मध्ये डुअल कॅमेरा देण्यात आला आहे.

पण कॅमेरा स्टाइल तीच आहे जी रेडमी नोट 5 प्रो आणि मी 6एक्स मध्ये होती. डावीकडे फ्लॅश सह डुअल कॅमेरा उपलब्ध आहे. पण याआधी जे लीक आले होते त्यात असा दावा करण्यात आला होता कि फोन मध्ये डुअल कॅमेरा सह फेस अनलॉक पण असेल.

आज च्या लीक मध्ये तुम्ही स्पष्ट पाहू शकता की मागच्या पॅनल वर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. तसेच फ्रंट मध्ये तुम्हाला बेजल लेस डिसप्ले मिळेल. पण बेजल रेडमी नोट 5 च्या तुलनेत जास्त दिसत आहेत आणि स्क्रीन वर एंडरॉयड कंट्रोल बटन्स पण दिसत आहेत.

तसेच फोनचा सीपीयू झेड स्क्रीनशॉट पण दिला गेला आहे ज्यातून प्रोसेसर ची माहिती मिळत आहे. शाओमी रेडमी एस2 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर सादर केला जाऊ शकतो. यासोबतच फोन मध्ये 2.02 गगीहट्र्ज आॅक्टाकोर प्रोसेसर मिळेल. त्यात रॅम ची माहिती दिली गेली नाही पण जीपीयू ​ची माहिती दिली गेली आहे.  

ईतर स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर आता पर्यंत मिळालेल्या लीक नुसार या फोन मध्ये 18:9 आसपेक्ट रेशियो वाला बेजल लेस डिसप्ले बघायला मिळू शकतो. कंपनी याला 5.99 इंचाच्या स्क्रीन सह सादर करू शकते. तसेच फोन मध्ये 440×720 पिक्सल रेजल्यूशन वाला एलसीडी डिसप्ले मिळू शकतो.

स्टोरेज पाहता शाओमी रेडमी एस2 मध्ये तुम्हाला 2जीबी आणि 3जीबी रॅम वेरियंट मिळतील. तसेच फोन मध्ये 16जीबी ची इंटरनल मेमरी असू शकते. आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या फोन मध्ये 12-एमपी चा ओमनिवीजन ओपी12ए10 कॅमेरा सेंसर असू शकतो तर दुसरा सेंसर सोनी आईएमएक्स486 असेल. सेल्फी साठी 5-मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. फ्रंट कॅमेरा सोबत ईआईएस आणि फेस अनलॉक सारखे फीचर्स मिळतील.

शाओमी रेडमी एस2 मध्ये कंपनी 3,080 एमएएच कपॅसिटी वाली बॅटरी मिळू शकते. हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर आधारित असेल. पण अजूनतरी मीयूआई ची माहिती मिळाली नाही.

LEAVE A REPLY