18 मे ला लॉन्च होईल वनप्लस 6, किंमत असेल 39,999 रुपये

वनप्लस 6 टेक जगातील बहुप्रतिक्षित स्मार्टफोंस मधील एक आहे. कित्येक महिन्यांपासून या फोन च्या बातम्या येत आहेत आणि आता कंपनी ने हे स्पष्ट केले आहे की वनप्लस 6 लवकरच लॉन्च केला जाईल, त्यामुळे दरदिवशी नव नवीन लीक्स समोर येत आहेत. या सर्व लीक्स नंतर आज बतामी आली आहे की वनप्लस 6 येणार्‍या 18 मे ला भारतात लॉन्च केला जाईल तसेच या फोन ची सुरवाती किंमत 39,999 रुपये असेल.

जर तुमचा फोन वापरत असेल जास्त रॅम तर करा हे उपाय

एका वेबसाइट ने आपल्या रिपोर्ट मध्ये वनप्लस 6 च्या बाबतीत धक्कादायक माहिती दिली आहे. कंपनी ने आता पर्यंत वनप्लस 6 ची लॉन्च डेट सांगितली नाही. तसेच फोन ची किंमत किंवा स्पेसिफिकेशन्स पण सांगितले नाहीत. पण वेबसाइट च्या रिपोर्ट नुसार वनप्लस कंपनी आपल्या या फ्लॅगशिप कीलर ला येणार्‍या 18 मे ला भारतीय बाजारात सादर करणार आहे आणि या फोनची सुरवाती किंमत 39,999 रुपये ठेवण्यात येईल.

वनप्लस 6 बद्दल बोलायचे झाले लीक्स नुसार या फोन मध्ये 6जीबी आणि 8जीबी ची रॅम मेमरी दिली जाईल तसेच यात 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी चे स्टोरेज आॅप्शन उपलब्ध होतील. त्याचबरोबर बातमी अशी आहे की हा फोन लेटेस्ट एंडरॉयड वर्जन सह क्वालकॉम च्या सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 ​वर चालेल.

अमेजॉन एक्सक्सूसिव असतील हुआवई पी20 प्रो आणि पी20 लाइट, 24 एप्रिलला होतील भारतात लॉन्च

वनप्लस 6 मध्ये बेजल लेस नॉच डिसप्ले दिला जाईल तसेच फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमरा सेटअप मिळेल. तसेच पावर बॅकअप साठी पण या फोन मध्ये दमदार बॅटरी असेल जी वायरलेस चार्जिंग ला सपोर्ट करेल. पण वनप्लस 6 च्या लॉन्च साठी कंपनी च्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे

LEAVE A REPLY