दोन फोन आणि एक लॅपटॉप घेऊन येतेय इनफिनिक्स कंपनी

Highlights

  • Infinix Note 12i आणि Zero 5G Turbo या महिन्यात भारतात लाँच होतील.
  • स्मार्टफोन्ससह Infinix Zerobook लॅपटॉप देखेल येणार.
  • फ्लिपकार्टवरून होणार विक्री.

इनफिनिक्सने आज अधिकृतपणे घोषणा केली आहे की कंपनी भारतीय बाजारात Infinix Note 12i आणि Zero 5G Turbo स्मार्टफोन लाँच करणार आहे आणि त्याचबरोबर ब्रँडचा लॅपटॉप Zerobook देखील बाजारात सादर केला जाईल. हे तिन्ही प्रोडक्ट या महिन्यात म्हणजे जानेवारी 2023 मध्ये भारतात लाँच होतील आणि यांची विक्री सेल ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाईल. इनफिनिक्सनं आपले तिन्ही प्रोडक्ट्सचे फोटो व स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत.

Infinix Note 12i 2022

  • 6.7 FHD Display
  • 4GB RAM+64GB ROM
  • 5,000mAh Battery

इनफिनिक्स नोट 12आय हा एक लो बजेट स्मार्टफोन असेल जो 6.7 इंचाच्या फुलएचडी डिस्प्लेसह येईल. या फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असेल तसेच 1000निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करेल. कंपनीनं सांगितलं आहे की हा मोबाइल फोन 4जीबी रॅमसह भारतात लाँच होईल तसेच हा 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. आशा आहे की या स्मार्टफोनमध्ये एक्सपांडेबल रॅम देखील दिली जाईल.

Infinix Note 12i मध्ये मीडियाटेक हीलियो जी85 चिपसेट मिळू शकतो. कंपनीनं अद्याप प्रोसेसरची माहिती दिली नाही. तसेच पावर बॅकअपसाठी या मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी असल्याचं स्पष्ट झालं आहे तसेच हा स्मार्टफोन 33वॉट सुपरचार्ज टेक्नॉलॉजीसह बाजारात येईल. फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल, यात प्रायमरी सेन्सर 50 मेगापिक्सलचा असू शकतो.

Infinix Zero 5G Turbo 2023

  • 13 GB RAM (8GB+5GB)
  • MediaTek Dimensity 1080
  • 50MP Rear Camera

इनफिनिक्स झिरो 5जी टर्बो बद्दल बोलायचं झालं तर हा पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेला स्मार्टफोन असेल. कंपनीनं सांगितलं आहे की हा मोबाइल फोन भारतात 8जीबी रॅमसह लाँच होईल. फोनमध्ये 5जीबी वचुर्अल रॅम मिळेल त्यामुळे Zero 5G Turbo मध्ये एकूण 13जीबी रॅमची पावर मिळू शकते. हा स्मार्टफोन 256जीबी इंटरनल स्टोरेजसह बाजारात येईल.

Zero 5G Turbo मध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकक डिमेनसिटी 1080 चिपसेट दिला जाईल. हा प्रोसेसर लॅग-फ्री एक्सपीरियंस देऊ शकतो. फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाईल जो आप्टिकल झूम फीचरसह येईल.

Infinix Zerobook

  • 15.6 LED backlit display
  • 16GB/32GB RAM
  • 512GB/1TB Storage

हा इनफिनिक्स झिरोबुक लॅपटॉप 15.6-इंचाच्या आयपीएस एलईडी बॅकलिट डिस्प्लेसह लाँच केला जाईल. ही स्क्रीन 400निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करेल. कंपनीनुसार हा लॅपटॉप डिवायस 16जीबी रॅम आणि 32जीबी रॅमच्या दोन मॉडेल्ससह एंट्री करेल जो 512जीबी स्टोरेज व 1टीबी स्टोरेजला सपोर्ट करेल. इनफिनिक्स झिरोबुक लॅपटॉप LPDDR5 RAM आणि NVMe PCIe4.0 SSD storage टेक्नॉलॉजीवर चालेल.

LEAVE A REPLY