कशी करावी आपल्या फोन साठी योग्य चार्जर ची निवड

काही दिवसांपूर्वी टीवी वर एक जाहिरात आली होती ज्यात एक व्यक्ति आपला फोन घेऊन चार्जर-चार्जर ओरडताना दिसत होती. ही जाहिरात तशी खोटी नाही. स्मार्टफोन चा वापर आजकाल इतका वाढला आहे की घर असो वा आॅफिस, प्रवासात असो किंवा मीटिंग मध्ये, जिथे पण चार्जर दिसतो तिथे आपण फोन कनेक्ट करतो. पण कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल की हाच चार्जर तुमचा फोन बिघडवू शकतो.

फोन चार्जिंग ला लावताना तुम्हाला हे माहीत नसते की कोणता चार्जर किती वोल्ट देत आहे. कारण प्रत्येक चार्जर ची पावर सप्लाई वेगळी असते. काही मध्ये कमी वोल्ट तर काही मध्ये जास्त वोल्ट. जर फोन मध्ये उच्च वोल्ट सपोर्ट नसेल तर फोन चार्ज करणे खतरनाक ठरू शकते तसेच कमी वोल्ट बॅटरी खराब करू शकते. त्यामुळे कधीही कोणताही फोन चार्ज करण्याआधी त्याला तपासून घ्या. आता तुम्हाला प्रश्‍न पडला असेल की कोणत्या चार्जर ने फोन चार्ज करावा आणि कोणता चार्जर योग्य वोल्ट देतो. त्याच्या उत्तरासाठी तुम्हाला हा लेख वाचावा लागेल.

एंडरॉयड स्मार्टफोन मध्ये बॅटरी पावर जाणून घेण्यासाठी तुम्ही अॅम्पेयर अॅप्लिकेशन डाउनलोड करू शकता. हा अॅप डाउनलोड केल्यानंतर सर्वात आधी सेल्स पॅक सोबत मिळालेला चार्जर कनेक्ट करा आणि अॅम्पेयर अॅप्लिकेशन आॅन करा. काही सेकेंड च्या चार्जिंग नंतर तुम्हाला हा माहिती देईल की तुमचा फोन किती वोल्ट ने चार्ज होत आहे. त्याचबरोबर चार्जिंग दरम्यान अधिकतम वोल्ट आणि न्यूनतम वॉल्ट ची माहिती पण मिळेल. अॅप मध्ये बॅटरी हेल्थ आणि तापमानाची माहिती पण देण्यात आली आहे. तुम्ही या माहितीचा स्क्रीन शॉट घ्या.

यानंतर तुम्ही कुठेही जाल आणि दुसरा चार्जर कनेक्ट कराल तेव्हा सर्वात आधी अॅम्पेयर अॅप्लिकेशन आॅन करा. थोड्या वेळात तुम्हाला माहिती दिली जाईल की किती पावर ने तुमचा फोन चार्ज केला जात आहे. चार्जर अधिकतम किती वोल्ट सप्लाई करत आहे आणि न्यूनतम वोल्ट ची पण माहिती मिळेल. आणि तुम्ही याची तुलना आधी घेतलेल्या स्क्रीन शॉट सोबत करू शकाल.

12,000 रुपयांमध्ये 10 सर्वात बेस्ट फोन

जर दुसरा चार्जर तुमच्या ओरिजिनल चार्जर इतका वोल्ट सप्लाई नसेल करत आणि त्यापेक्षा थोडा कमी किंवा जास्त सप्लाई करत असेल तर तो वापरण्या लायक आहे. पण जर जास्त फरक असेल तर तो चार्जर न वापरलेला बरा.

जर तुम्ही सतत जास्त वोल्ट ने फोन चार्ज केला तर बॅटरी लवकर खराब होईल. पण बॅटरी हेल्थ वर लगेच प्रभाव दिसून येणार नाही पण काही दिवसांमध्ये तुम्हाला हा बदल दिसून येईल. तसेच जर दुसरा चार्जर खुप जास्त वोल्ट सप्लाई करत असेल आणि फरक जवळपास दुप्पट असेल तर लगेच काढून टाका.

 

या अॅप्लिकेशन मध्ये तुम्ही हे पण जाणून घेऊ शकता की तुमचा फोन किती पावर वापरत आहे. हे बघून तुम्ही बॅटरी मॅनेजमेंट ने बॅटरी आॅप्टिमाइज पण करू शकता ज्यामुळे कमी चार्जिंग असूनही फोन जास्त चालेल. फोन मधील बॅटरी वापर जाणून घेण्यासाठी सर्वात आधी तुम्ही अॅम्पेयर अॅप्लिकेशन च्या सेटिंग मध्ये जा. सेटिंग चा पर्याय तुम्हाला अॅप्लिकेशन च्या उजवीकडे वरच्या बाजूला मिळेल. तिथे बेसिक सेटिंग निवडा.

या सेक्शन मध्ये तुम्हाला इन्हांस्ड मेजरमेंट चा आॅप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही बाहेर अॅप्लिकेशन च्या मुख्य स्क्रीन वर जा. तुम्हाला माहिती मिळेल की तुमच्या फोन ने किती पावर वापरली आहे. तुम्ही डेटा, वाईफाई आणि ब्राइटनेस बंद करून जास्त बॅटरी वाचवू शकता.

जर तुमच्या फोन चा चार्जर खराब झाला तर तुम्ही या अॅप च्या मदतीने योग्य चार्जर निवडू शकाल. जो योग्य पावर सप्लाई करेल तोच चार्जर चांगला असेल. हा अॅप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

LEAVE A REPLY