4,600एमएएच बॅटरी आणि 3जीबी रॅम सह लॉन्च झाला 10-इंच स्क्रीन वाला अल्काटेल ए3, किंमत 11,999 रुपये

मागच्या वर्षी जून महिन्यात टेक कंपनी अल्काटेल ने भारतीय टॅबलेट बाजारात आपला स्वस्त टॅबलेट ए3 10-इंच लॉन्च केला होता. हा स्मार्ट डिवाईस देशात 9,999 रुपयांच्या किंमतीत सादर झाला होता जो शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होता. आज अल्काटेल ने आपल्या या टॅबलेट चे अजून एडवांस आणि अपग्रेड वर्जन देशात लॉन्च केले आहे. कंपनी कडून नवीन अल्काटेल ए3 10-इंच टॅबलेट 11,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च केला गेला आहे जो ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध आहे.

अल्काटेल ए3 10-इंच टॅबलेट चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर कंपनी ने यात 1280 × 800 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 10-इंचाचा एचडी आईपीएस डिसप्ले दिला आहे. टॅबलेट ची डिजाईन 3डी टेक्चर वर निर्मित आहे जो यूजर्सना मोठा डिसप्ले असुनही चांगली पकड देतो. हा टॅबलेट एंडरॉयड 7.0 नुगट आधारित आहे जो 1.1गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक एमटी8735बी चिपसेट वर चालतो.

कंपनी ने नवीन अल्काटेल ए3 टॅबलेट 3 जीबी रॅम मेमरी सह सादर केला आहे. टॅबलेट मध्ये 32 जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 128 जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे झाले तर टॅबलेट च्या बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन मध्ये 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. अल्काटेल ए3 चा कॅमेरा वीडियो कॉलिंग साठी ब्यूटी फीचर ला सपोर्ट करतो.

अल्काटेल ए3 च्या या नवीन वर्जन मध्ये कंपनी ने 4जी एलटीई सह वाईफाई सपोर्ट पण दिला आहे जो चांगली इंटरनेट एक्सेस देतो. हा एक सिंगल सिम टॅबलेट आहे जो बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह स्प्लिट स्क्रीन सारखे मोड पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी या टॅबलेट मध्ये 4,600एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी कंपनी च्या दाव्यानुसार 1300 तासांचा स्टँडबाय टाईम देण्यास सक्षम आहे. कंपनी कडून 11,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च झालेला हा टॅबलेट वाईट+ग्रे, वाईट+ब्लू आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY