पहिल्याच सेलमध्ये मोठी सूट! स्वस्त Realme C33 झाला आणखी स्वस्त; सिंगल चार्जवर 37 दिवसांचा बॅकअप

Realme C33 All Color Varients

गेल्या आठवड्यात रियलमीनं आपला एक स्वस्त स्मार्टफोन Realme C33 सादर केला होता. या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. आज ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर रियलमीचा हा बजेट स्मार्टफोन पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध होईल. रियलमीच्या या स्मार्टफोनवर फ्लिपकार्टवरील अ‍ॅन्युअल सेल Flipkart Big Billion Days सेलच्या आधीच धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. पुढे आम्ही तुम्हाला Realme C33 स्मार्टफोनवरील ऑफर आणि या स्मार्टफोनच्या सर्व फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

Realme C33 वरील ऑफर्स

Realme चा हा बजेट स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 8,999 रुपयांच्या बेस किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन विकत घेताना HDFC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डनं पेमेंट केल्यास 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे या फोनची किंमत 7,999 रुपये होईल. तसेच जर तुम्हाला अजून सूट हवी असेल तर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करू शकता.

50 Mp camera phone Realme C33 cheap price specifications sale offer deals details

जुन्या फोनची एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या फोनच्या मॉडेल आणि त्याच्या कंडीशनवर अवलंबून असेल. फ्लिपकार्टवर रियलमीच्या या स्मार्टफोनसह युजर्सना Discovery+ च्या सब्सक्रिप्शनवर 25 टक्क्यांचा डिस्काउंट, 201 रुपयांचे बिटकॉइन CoinDCX वर आणि कूकू एफएमचं एक महिन्याचं सब्सक्रिप्शन दिलं जात आहे. हे देखील वाचा: अमेरिकन आयफोनला मि��णार स्वदेशी ‘टच’; लवकरच TATA कंपनी बनवू शकते iPhone

Realme C33 Specifications

रियलमी सी33 स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर झाला आहे जो 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 60हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 88.7% स्क्रीन-टू-बॉडी रेशियो व 16.7एम कलर सारख्या फीचर्सना सपोर्ट करते.

फोटोग्राफीसाठी रियलमी सी33 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.8 अपर्चर असलेल्या 0.3 मेगापिक्सल सेकंडरी लेन्ससह येतो. Realme C33 मध्ये 5MP चा Selfie Camera आहे.

Realme C33 नवीन अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच करण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 1.82गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc T612 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा मोबाइल फोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. भारतात रियलमी सी33 3 जीबी रॅम व 4 जीबी रॅमसह लाँच करण्यात आला आहे. हे देखील वाचा: Realme आणतेय अजून एक स्वस्त स्मार्टफोन Narzo 50i Prime; पुढील आठवड्यात येणार भारतीयांच्या भेटीला

50 Mp camera phone Realme C33 cheap price specifications sale offer deals details

हा ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 3.5एमएम जॅक व ओटीजी सपोर्टसह बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. सिक्योरिटीसाठी हा फोन साइड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रियलमी सी33 मध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 37 दिवसांचा स्टँडबाय टाइम देते, असा दावा कंपनीनं केला आहे.

LEAVE A REPLY