12,000 रुपयांमध्ये 10 सर्वात बेस्ट फोन

Highlights
  • Realme 10 Pro series has been launched officially in China.
  • Realme 10 Pro+ ships with the latest Dimensity 1080 SoC, 108MP primary camera, and a 120Hz curved display.
  • Realme 10 Pro price starts at RMB 1599 (approx Rs 18,300)


जेव्हा एक चांगला फोन घेण्याचा प्रश्न येतो तेव्हा तुमच बजेट खुप जास्त असलेच पाहिजे असे नाही. उलट बेस्ट परफॉर्मेंस आणि दमदार स्पेसिफिकेशन वाले फोन कम रेंज मध्ये पण उपलब्ध आहेत. या रेंज मध्ये खुप मॉडेल आहेत आणि त्यातील सर्वात बेस्ट फोन तुम्ही निवडू शकता. खाली आम्ही 12,000 रुपयांच्या बजेट मध्ये टॉप फोन ची माहिती दिली आहे जे सध्यातरी शानदार म्हणू शकतो.

1. असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो वाला बेजल लेस डिसप्ले आहे. फोन मध्ये 6-इंचाचा 2.5डी कर्व्ड मोठा फुलव्यू फुलएचडी+ डिसप्ले देण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो आणि यात 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. झेनफोन मॅक्स प्रो एम1 प्रो 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी तसेच 4जीबी रॅम मेमरी सह 64जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोटोग्राफी साठी या 13-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल च्या दोन कॅमेरा सेंसर आहेत जे एलईडी फ्लॅश ला सपोर्ट करताता. तर सेल्फी साठी फोन मध्ये फ्लॅश लाईट सह 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. या फोन मध्ये 5,000एमएएच ची दमदार बॅटरी पण आहे.

2. आॅनर 9 लाइट

यावर्षीच्या सुरवातीला आॅनर ने 9 लाइट मॉडेल भारतात सादर केला होता आणि सध्यातरी हा 12,000 रुपयांच्या बजेट मध्ये सर्वात स्टाइलिश फोन म्हणू शकतो. स्टाइल व्यतिरिक्त फोन चे फीचर्स पण दमदार आहेत. आॅनर 9 लाइट मध्ये 13-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबत 13-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा पण उपलब्ध आहे. एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.0 नुगट आधारित या फोन मध्ये 3,000 एमएएच ची लीथियम पॉलीमर बॅटरी देण्यात आली आहे. या फोन मध्ये 5.7—इंचाची स्क्रीन दिली गेली आहे. आॅनर 9 लाइट हुआवई च्या हाईसिलिकॉन किरिन 659 चिपसेट वर चालतो आणि यात 2.36गीगाहट्र्ज चा कोर्टेक्स ए53 आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 3जीबी आणि 4जीबी मेमरी वेरियंट सह उपलब्ध आहे आणि यात तुम्हाला 32जीबी आणि 64जीबी ची इंटरनल मेमरी मिळेल.

3. शाओमी रेडमी नोट 5

हा फोन मागच्या वर्षीच्या शाओमी रेडमी नोट 4 चा अपग्रेड वर्जन आहे. यात दोन मॉडेल आहेत आणि दोन्ही तुमच्या बजेट मध्ये आहेत. 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी. शाओमी रेडमी नोट 5 मध्ये 5.99-इंचाची फुल 18:9 रेशियो वाली एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी गोरिल्ला ग्लास कोटेड आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर चालतो आणि यात 64बिट्सवाला 2.0गीगाहट्र्ज चा कोर्टेक्स ए53 आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफी साठी यात 12-मेगापिक्सल चा रियर तसेच 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. तसेच पावर बॅकअप साठी 4,000 एमएएच ची बॅटरी आहे.

4. बिलियन कॅप्चर प्लस

काही महिन्यांपूर्वी भारतातील नंबर एक ईकॉमर्स साइट फ्लिपकार्ट ने आपला पहिला फोन लॉन्च केला आहे. कंपनी ने बिलियन कॅप्चर प्लस आणला आहे. या फोन च्या बॅक पॅनल वर डुअल टोन फ्लॅश सह 13-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तर फोन च्या फ्रंट पॅनल वर सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 8-मेगापिक्सल कॅमेरा सेंसर मिळेल. बिलियन कॅप्चर प्लस मध्ये तुम्हाला 1920×1080 पिक्सेल रेज्ल्यूशन वाला 5.5-इंचाचा फुलएचडी डिसप्ले मिळेल. हा फोन एंडरॉयड 8.0 ओरियो वर चालतो आणि कंपनी ने याला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर सादर केले आहे. कॅप्चर प्लस 3जीबी रॅम सह 32जीबी च्या इंटरनल स्टोरेज तसेच 4जीबी रॅम सह 64जीबी च्या इंटरनल स्टोरेज वेरियंट मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोन पण खुप दमदार असल्याचे बोलले जात आहे.

5. शाओमी रेडमी 5

काही दिवसांपूर्वी शाओमी ने कमी किंमतीत बेजल लेस डिसप्ले वाला रेडमी 5 भारतीय बाजारात आणला आहे. हा खुप चांगला आहे. रेडमी 5 मध्ये 5.7-इंचाची बेजल लेस स्क्रीन देण्यात आली आहे. शाओमी रेडमी 5 क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर सादर करण्यात आला आहे आणि यात 64बिट्सवाला 1.4गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर आहे. हा मीयूआई 9 वर चालतो जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 7.1 नुगट आधारित आहे. फोटोग्राफी साठी 12-मेगापिक्सल चा रियर आणि 5-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोन मध्ये तुम्हाला डबल सिम सपोर्ट मिळतो. दोन्ही सिम सोबत तुम्ही 4जी वोएलटीई वापरू शकता. सिक्योरिटी साठी फिंगरप्रिंट सेसर देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल मध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी शाओमी रेडमी 5 मध्ये 3,300 एमएमएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

6. लेनोवो के8 नोट

हा फोन खुपच शानदार आहे. लेनोवो के8 नोट मध्ये 5.5-इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 कोटेड आहे. हा फोन मीडियाटेक एक्स23 एमटी6797डी चिपसेट वर चालतो आणि यात 2.3गीगाहट्र्ज डेकाकोर अर्थात दहा कोर वाला प्रोसेसर देण्यात आला आहे. के8 नोट 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम सह 64 जीबी ची इंटरनल मेमरी उपलब्ध आहे. हा लेनोवो के नोट सीरीज चा पहिला फोन आहे जो डुअल रियर कॅमेरा सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 13+5-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात तुम्ही बोके इफेक्ट वापरू शकता. फोन मध्ये 13-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा पण आहे. लेनोवो के8 नोट मध्ये एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 7.1 नुगट मिळेल. फोन मध्ये 4000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

7. इनफिनिक्स हॉट एस3

हा फोन सेल्फी सेंट्रिक लोकांना नक्की आवडेल. हॉट एस3 स्मार्टफोन ची सुरवाती किंमत 8,999 रुपये आहे. या फोन मध्ये 20-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन चा सेल्फी कॅमेरा लो लाईट सेल्फी घेण्यास सक्षम आहे. तर रियर कॅमेरा 13-मेगापिक्सल चा आहे. फोन मध्ये 5.65-इंचाचा 18:9 रेशियो वाला बेजल लेस एचडी+ डिसप्ले ​आहे. हा फोन एक्स ओएस 3.0 आधारित एंडरॉयड 8.0 ओरियो वर सादर करण्यात आला होता तसेच आॅक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 चिपसेट वर चालतो. कंपनी ने हा फोन दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे यात 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम सह 64जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्स ची किंमत क्रमश: 8,999 रुपये आणि 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे. पावर बॅकअप साठी 10,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे

LEAVE A REPLY