१३ जून २०२४
2015 मध्ये आम्ही WhatsApp वर कॉल करणे पुन्हा सादर केल्यापासून, आम्ही ग्रुप कॉल्स, व्हिडिओ कॉल्स आणि मल्टी--प्लॅटफॉर्म सपोर्ट या सुविधा देऊन त्यामध्ये सुधारणा करणे चालू ठेवले आहे.
आज आमच्याकडे तुमच्या डिव्हाइसेसवर कॉल आणखी मोठे आणि आणखी चांगले करतील असे अनेक अपडेट्स आहेत, जे पुढील काही आठवड्यांमध्ये रोल आउट केले जातील:
तुम्ही कुठेही असलात तरीही, कॉल्स सुस्पष्ट असावेत यासाठी आम्ही अथकपणे ऑडिओ व व्हिडिओच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करत असतो. आम्ही अलीकडेच MLow codec लाँच केले आहे, ज��यामुळे कॉलची विश्वासार्हता वाढते. मोबाइल डिव्हाइसेसवर केलेल्या कॉल्सना सुधारित नॉइझ आणि इको कॅन्सलेशनचा फायदा होतो, ज्यामुळे खूप आवाज असणाऱ्या वातावरणात कॉल्स करणे सोपे होते आणि वेगवान कनेक्शन असलेल्यांना व्हिडिओ कॉल्समध्ये आणखी उच्च रिझोल्यूशन मिळते. तुमची नेटवर्क कनेक्टिव्हिटी खराब असेल किंवा तुम्ही जुने डिव्हाइस वापरत असलात, तरीही एकूण ऑडिओ सुस्पष्ट असतो. MLow codec बद्दल तुम्ही येथे अधिक वाचू शकता आणि ऑडिओच्या गुणवत्तेतील फरक ऐकू शकता.
आम्ही WhatsApp वर कॉलिंगसंबंधित सुधारणा करत राहू, जेणेकरून तुम्ही जगात कुठेही असलात, तरीही सर्वोत्तम गुणवत्तेचे खाजगी कॉल्स करू शकता.